Our Work

आनंदी शिक्षण

Published on: September 4, 2025

गरजू विद्यार्थांना शालेय साहित्य त्याच बरोबर शैक्षणिक फी ची मदत गरजेची आहेच परंतु या बरोबरच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होणे तितकेच महत्वाचे.
हे ओळखून ज्ञानप्रबोधिनी पुणे यांच्या सहकार्याने आनंदी शिक्षण प्रकल्प महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये राबवण्याचे ठरवले.
आनंदी शिक्षण म्हणजे
हसत खेळत शिक्षण.

हसत खेळत गणित ,विज्ञान , स्मरणशक्ती , विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास,अशा विविध पैलूंवर आधारित हा उपक्रम आहे, या शैक्षणिक प्रकल्पातील काही भाग प्रायोगिक तत्त्वावर श्री सुरज रसाळ सर यांच्या सहकार्याने महापालिका शाळा नंबर सहा,टाकळी रोड मिरज येथे राबविण्यास आम्ही सुरुवात केली आहे.
याचा फायदा असा दिसून आला की जे विद्यार्थी अभ्यासाला टाळाटाळ करतात ,ज्यांना शाळेबद्दल गोडी कमी वाटते,अशा विद्यार्थ्यांमध्ये खूप सकारात्मक बदल घडताना पाहायला मिळत आहे.
त्यामुळे भविष्यात सेवाध्यास मार्फत या प्रकल्पा साठी सांगली आणि सांगली बाहेर असे उपक्रम केंद्र मोफत सुरू करायचा आमचा मानस आहे ,तिथे जिल्हा परिषद शाळा ,महापालिका शाळा , खाजगी अनुदानित शाळा येथील शिक्षकांना सुद्धा मार्गदर्शन द्यायचा आमचा मानस आहे .

Work Cover Image

Moments That Matter

1 of 46