Each story highlights the value we bring to our clients through dedication and results

“सेवाध्यास फाउंडेशन” सेवेचा ध्यास घेतलेली ही संस्था गेल्या काही वर्षापासून सामाजिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करत आहे. निराधार वृद्धांना दर महिना घरपोच रेशन असो हुशार गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात मदत असो, मदत योग्य व्यक्तींनाच मिळावी हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. या संस्थेचे काम असेच पुढे चालू राहावे अशा माझ्याकडून त्यांना शुभेच्छा.
डॉ शिल्पा दाते -काळे
प्रसिद्ध स्त्री आरोग्य तज्ञ, सांगली
सेवाध्यास फाउंडेशन ही सिटी हायस्कूल च्या माजी विद्यार्थ्यांनी अत्यंत तळमळीने आणि अत्यंत निस्वार्थ भावनेने सुरू केलेली एक सामाजिक चळवळ आहे. सेवाध्यास या नावातच त्यांच्या कार्याचे उद्दिष्ट आणि दिशा समजते. समाजऋण फेडण्याच्या समर्पित भावनेतून वेळोवेळी निर्माण होणाऱ्या समस्या ,संकटे व आव्हाने यांचा सूक्ष्म अभ्यास व जाणीव ठेवून हे तरुण समाजसेवक आपला अमूल्य वेळ,श्रम , आणि अर्थ साहाय्य देऊन समाजातील निराधार वृद्ध,गरीब होतकरू विद्यार्थी यांना सर्वतोपरी आधार देत आहेत. विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे आमच्या माध्यमिक व प्राथमिक शाळेतील गरजू मुलींमधील एकल स्त्री पालक कुटुंबे जेवढी आहेत यांचे घरी भेट देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती जाणून घेतली.अशा निराधार भगिनींना त्यांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली हीच त्यांनी राबवलेली खरी खुरी "लाडकी बहीण " योजना आहे. या संस्थेला सेवेचा ध्यासच असल्याने त्यांच्या पुढे गरजू लोकांसाठी नवनवीन सेवाक्षेत्रे शोधण्याचे स्वप्न आहे. त्यांची स्वप्ने व संकल्प साकार होऊदेत ही शुभेच्छा.
नीला बोडस
सदस्य ,वुमन्स एज्युकेशन सोसायटी ,सांगली.
सेवाध्यास फाउंडेशन म्हणजे जणू 'सेवाच ध्यास आणि सेवाच श्वास' हे ब्रीद घेऊन चालणारी सामाजिक संस्था. सदर फाउंडेशन मार्फत गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून मदत केली जाते. फक्त शैक्षणिक संस्था व विद्यार्थी नाही तर अनाथ मुले व निराधार व्यक्ती यांना देखील मदत पोहोचवण्याचे काम फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अमेय फाळके व सचिव विजय निकम यांचे मार्फत केले जाते.सोबत च प्लास्टिक चां वापर टाळण्यासाठी व्यापक प्रमाणात मोहीम सदर फाउंडेशनने राबवली आहे. आमच्या शाळेतील गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांना फाउंडेशन मार्फत चांगली मदत मिळाली. ‘मदत देत असताना अतिशय सूक्ष्म निरीक्षण व नियोजन सदर फाउंडेशनच्या सर्व सदस्यांमार्फत केले जाते’ ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. या धावत्या जीवनात देखील आपण हा सेवेचा वसा स्वीकारला आहे, आपण करत असलेले काम हे ईश्वर सेवेचे काम आहे. एक दिवस नक्कीच सेवा ध्यास फाउंडेशन सेवा देण्याच्या बाबतीत गगन भरारी घेईल यात शंका नाही. आम्ही नेहमी या फाउंडेशन सोबत असू अशी ग्वाही देतो व फाउंडेशनच्या पुढील समजिक कार्यास शुभेच्छा देतो.
रमेश शिंगाडे
मुख्याध्यापक-पै भगवानराव दुधाळ - पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित प्राथमिक शाळा संजयनगर सांगली
सेवा म्हणजे कृतज्ञता !अशी सेवा जर गरजवंताच्या चरणी अर्पण केली तर त्या कृतज्ञतेला सौख्याचे कोंदण लाभतं. आपण आज आमच्या श्री. राजाराम रंगलाल सारडा प्राथमिक कन्याशाळा, सांगली येथे येऊन इयत्ता पहिली ते चौथी मधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे जे वाटप केलेत यातून आपली कृतज्ञता उमजून येते. मुलींच्या शिक्षणासाठी आपण जे पाऊल उचलले आहे त्याबद्दल आम्ही आणि समस्त समाज आपणास सर्वांना विनम्र अभिवादन करतो. 🙏 या निमित्ताने दातृत्वाचा सर्वोत्तम परिपाठ आपण आज सादर केलात. याबद्दल आपले मनःपूर्वक आभार ! 🙏🙏 आपणास आणि 'सेवाध्यास फाउंडेशन'च्या सर्व सभासदांना आमचा मानाचा मुजरा !*