शैक्षणिक साहित्य मदत
Published on: September 4, 2025
सांगली आणि उपनगरात अशा बऱ्याच शाळा आहेत की जिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक हमाली,बांधकाम व्यवसायात मजूर,रिक्षा चालक,भंगार गोळा करणारे असे आहेत.
या विद्यार्थ्यांच्या पुढे आजही वह्या,
दप्तर,गणवेश या सारख्या किमान वस्तू विकत घेणे हे एक दिव्य असते.
अशा विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवाहतून बाहेर पडू नये यासाठी सेवाध्यासचा प्रयत्न आहे.
चांगल्या उद्देशा बरोबरच ती मदत नेमकी गरजू हातापर्यंत पोहोचणे गरजेचे असते. त्यासाठी विद्यार्थ्याची पडताळणी करणे आवश्यक असते.
अशा वेळी सेवाध्यास स्वतःचे प्रतिनिधी आणि शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या मदतीने ही प्रक्रिया पार पडते.
या मध्ये विद्यार्थ्यांची यादी बनवणे त्यांची इयत्ता, रहिवासी पुरावा ,आई आणि वडिलांच्या कामाचे स्वरूप याची माहिती घेतली जाते. आणि आणि त्यानंतरच शालोपयोगी वस्तू ,गणवेश यांचे वाटप केले जाते
'चला शिकवूया' या आमच्या संस्थेच्या योजने अंतर्गत निराधार ,गरजू हुशार, एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि शालेय साहित्य पुरवण्यासाठी दत्तक घेतले जाते. सध्या असे २० विद्यार्थी आमच्या सहकार्याने शिक्षण घेत आहेत.
समर्थ प्राथमिक विद्यामंदिर , समर्थ नगर कुपवाड रोड ,सांगली. पटवर्धन हायस्कूल सांगली, कै. ग. रा.पुरोहित कन्या प्रशाला सांगली, यशोदीप अंगणवाडी आलास, गुरुवर्य वा. के. सावईकर प्राथमिक शाळा उत्तर शिवाजीनगर सांगली,
राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा, सांगली.
श्री राजाराम रंगलाल सारडा प्राथमिक कन्या शाळा सांगली
या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांनी वरील सर्व प्रकारच्या मदतीचा लाभ घेतला आहे.

Moments That Matter

1 of 36