व्यक्तिगत मदत
Published on: January 15, 2026
पश्चिम महाराष्ट्रातील एका छोट्या गावात राहणाऱ्या, इस्रो, डी.आर.डी.ओ अशा संस्थांमधे काम करून देशसेवेचे स्वप्न बाळगणाऱ्या आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आय.आय.टी खड्गपूर येथे निवड झालेल्या एका होतकरु विद्यार्थ्याला ₹ २०,०००चा धनादेश देऊन त्याच्या उज्वल भवितव्यामध्ये सेवाध्यास फाउंडेशनने खारीचा वाटा उचलला .
वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे आयटी विभागामध्ये शिक्षण घेत असलेल्या एका गरजू विद्यार्थिनीला सलग तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी तिची कॉलेजची फी भरण्यासाठी सेवाध्यास फाउंडेशन ने मोलाचे सहकार्य केले.
भगिनी निवेदिता प्रतिष्ठान सांगली संचलित सुधार गृह यशवंत नगर येथे नुकतीच ऍडमिशन घेतलेल्या एका गरजू महिलेला त्याच सेंटरमध्ये नर्सिंग कोर्स करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी
सेवाध्यास फाउंडेशन कडून दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली.
Moments That Matter
1 of 7