कॉम्प्युटर सायन्स शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा उपक्रम
Published on: July 13, 2026
सेवाध्यास फाउंडेशन तर्फे आज दत्त महाविद्यालय कुरुंदवाड येथे सध्या कॉम्प्युटर सायन्स साठी ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या आणि १० वी मध्ये ९२% मार्क मिळवलेल्या एका गरजू ,प्रामाणिक आणि हुशार मुलीची फी अमेरिकेत स्थायिक असलेले मित्र मुबारक मुजावर यांच्या आर्थिक सहकार्यातून भरण्यात आली, फी च्या रकमेचा चेक , विद्यार्थिनी ज्या शाळेत घडली त्याच तिच्या दत्त विद्या मंदिर नृसिंहवाडी प्राथमिक शाळेचे आणि माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक वाडीकर सर आणि कुंभार मॅडम यांच्या हस्ते ,महाविद्यालयाचे प्रिन्सिपॉल श्री पाटील सर यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला.
एखाद्या गरजू विद्यार्थ्याची शिक्षणाची धडपड हे तिच्या पालकासोबत तिचे शिक्षकच चांगल्या प्रकारे ओळखू शकतात याचा अनुभव आज पुन्हा एकदा आला.
सध्या तरी आपण तिची कॉम्प्युटर सायन्स पहिल्या वर्षाच्या प्रवेशाची इच्छा पूर्ण करू शकलो त्याबद्दल समाधान वाटत आहे.