पै भगवानराव दुधाळ प्राथमिक शाळेस लोखंडी बेंच वितरण
Published on: September 1, 2025
पै. भगवानराव दुधाळ प्राथमिक शाळा संजय नगर या शाळेमध्ये सेवाध्यास फाउंडेशन कडून आज दिनांक २३/०८/२०२५ रोजी विद्यार्थांच्या सोयीसाठी १२ लोखंडी बेंच वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे सदस्य उदय सावत,कुणाल शिवलकर, गोमटेश किल्लेदार,आरती गुर्जर आपटे, अमेय फाळके उपस्थित होते . गोमटेश किल्लेदार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या उपक्रमास संस्थेचे सदस्य उदय सावत,दीपक कुलकर्णी, अनिरुद्ध पटवर्धन, आरती घाळी मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.
गरजू विद्यार्थ्यांसाठी धडपडणाऱ्या शिक्षकांच्या मागे सेवाध्यास फाउंडेशन ठाम पणे उभी आहे आणि भविष्यातही राहील असे मनोगत आणि विश्वास शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश शिंगाडे ,सर यांनी व्यक्त केले.
सेवाध्यास फाउंडेशन चे सर्व सभासद ,देणगीदार ,हितचिंतक, शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश शिंगाडे सर आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांचेही मनःपूर्वक आभार

Moments That Matter

1 of 5