Our Work

डॉ देशपांडे बाल विद्या मंदिर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Published on: September 1, 2025

आज डॉ.देशपांडे बाल विद्या मंदिर ,सांगली येथे सेवाध्यास फाउंडेशन मार्फत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
आज योगा योगाने नेताजी सुभाष चंद्र बोस यांची पुण्यतिथी सुद्धा होती. त्यामुळे त्या निमित्ताने त्यांच्या महान कार्यच स्मरण सुद्धा झालं.
या कार्यक्रमासाठी श्री.दिवाकर कुलकर्णी काका,सेवाध्यास फाउंडेशनचे सदस्य अरुणा रेपे,आरती आपटे, योगेश झांबरे , विजय निकम,अमेय फाळके, आणि देशपांडे बाल विद्यामंदिर संस्थेच्या अध्यक्षा लताताई देशपांडे स्वतः उपस्थित होत्या.
अतिशय छान नियोजन बद्ध कार्यक्रम पार पडला.

चांगले विद्यार्थी घडवण्याचा शाळेतील शिक्षकांचा आणि संस्थेच्या अध्यक्षा लताताई देशपांडे यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.

सेवाध्यास चे सहकारी अँड.श्री शैलेंद्र दादा केळकर, आरती आपटे,निलेश कुलकर्णी(सध्या राहणार अमेरिका),देवांग शाह, मिलिंद चितळे या सर्वांचे या कामासाठी मोलाचे योगदान लाभले.
आपण या शाळेपर्यंत पोचलो आणि लताताईं सारख्या महान व्यक्तींच्या शाळेत आपल्याला फुल ना फुलाची पाकळी सेवा करण्याची ही संधी आपले सहकारी आणि देशपांडे बाल मंदिर शाळेचे संचालक श्री मिलिंद चितळे यांच्या मुळे मिळाली.
उपस्थित सर्व शिक्षक ,मुख्याध्यापिका सौ राजश्री डिगे मॅडम,सर्व सदस्य आणि देणगीदार या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

Work Cover Image

Moments That Matter

1 of 6