Our Work

गरजू विद्यार्थिनींना गणवेश आणि वह्या वाटप

Published on: January 14, 2026

आज सेवाध्यास फाउंडेशन, सांगली या संस्थेमार्फत राणी सरस्वतीदेवी कन्याशाळा येथील काही गरजू विद्यार्थिनींना गणवेश आणि वह्या वाटप करण्यात आले.

स्प्रेडिंग स्माईल्स,पुणे या संस्थेकडून वह्यांसाठी आर्थिक सहाय्य भेटले. त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार.
सेवाध्यास फाउंडेशन चे सचिव श्री विजय निकम आणि सदस्य श्री भीमेश देशपांडे यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.
आदर ,करूणा ,आणि प्रेम सतत आपल्या सोबत असले पाहिजे म्हणजे आपली प्रगती निश्चित होते असे मोलाचे विचार श्री भीमेश देशपांडे यांनी विद्यार्थिनींना दिले.

नुसत्या वह्या न देता काही चांगले विचार त्यांच्या सतत नजरेत रहावेत म्हणून वाहतुकीचे नियम पाळणे, कचरा रस्त्यावर न टाकणे,आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे अशा संदेशाचे एक स्टिकर वहीवर लावले होते ,
हे स्टिकर मित्र श्री, अभिजीत जंगम यांनी मोफत करून दिले त्याबद्दल त्यांचेही आभार.
सौ खराडे मॅडम ,मुख्याध्यापिका उपस्थित सर्व शिक्षक ,मित्र श्री विनय देशमुख आणि सेवाध्यास संस्थेचे इतर सर्व सदस्य यांचेही मनःपूर्वक आभार.

Work Cover Image

Moments That Matter

1 of 6