कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे येथील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन.
Published on: September 1, 2025
'अभियांत्रिकीच्या प्रत्येक विद्यार्थ्याने कोणत्याही एनजीओच्या कामात एक महिना प्रत्यक्ष सहभागी होणे आणि एनजीओ ची कार्यपद्धती समजावून घेणे' या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे यांच्या स्तुत्य उपक्रमांतर्गत १५ मे ते १५ जून २०२४ या कालावधीत ऋषिकेश पाटील आणि हर्षिता साळी या दोन सीओईपी च्या विद्यार्थ्यांनी सेवाध्यास फाउंडेशनशी संपर्क साधून सेवाध्यास फाउंडेशनच्या परिवाराचे काम समजावून घेतले
फाउंडेशनच्या सदस्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून ओला आणि सुका कचरा याचे नियोजन कसे करावे, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत, रस्त्यावर पडणाऱ्या प्लास्टिक मुळे निर्माण होणारे धोके अशा विषयांवर लहान मुलांची कार्यशाळा स्वतः घेऊन त्यांना मार्गदर्शन केले; त्याबद्दल सेवाध्यास फाउंडेशन कडून या दोन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही देण्यात आले.

Moments That Matter

1 of 5