स्वातंत्र्यदिना निमित्य पै.भगवानराव दुधाळ चॅरिटेबल ट्रस्ट येथे ध्वजारोहण
August 15, 2025
आज १५ ऑगस्ट ,स्वातंत्र्यदिना निमित्य ,पै.भगवानराव दुधाळ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित प्राथमिक शाळा,संजयनगर येथे ध्वजारोहणाचा मान आपल्या सेवाध्यास फाउंडेशन ला मिळाला , संस्थेचे सचिव श्री विजय निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले , आपण सर्वांनी मिळून जो सेवेचा ध्यास घेतला आहे त्या सेवेच्या ध्यासाची ही पोच पावतीच म्हणावी लागेल. मुख्याध्यापक श्री. रमेश शिंगाडे सर , संस्थापक श्री दुधाळ सर यांनी सुद्धा आपल्या संस्थेवर विश्वास आणि प्रेम दाखवलं आणि आपल्याला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक धन्यवाद.
१३ ऑगस्ट या दिवशी गुरुवर्य वा.के सावईकर प्राथमिक शाळा,वडर कॉलनी सांगली ,आणि आज १५ ऑगस्ट या दिवशी दुधाळ शाळा ,संजय नगर सांगली या दोन्ही शाळांमध्ये या वर्षी ध्वजारोहणाचा मान आपल्या संस्थेला मिळाला याच पूर्ण श्रेय आपण सर्व सदस्य आणि देणगीदार मिळून जे प्रामाणिक प्रयत्न करत आहोत त्याला जाते.
सेवाध्यास चे कार्य दिवसेंदिवस असेच वाढत राहुदे हीच या तिरंग्याच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना.
जय हिंद