सांगलीत पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी या संस्थेच्या आनंदी शिक्षण उपक्रमाला प्रारंभ
August 02, 2026
ज्ञानप्रबोधिनीच्या सहकार्याने शिक्षकांचे पहिले प्रशिक्षण शिबिर संपन्न
सांगली, दि. ३ — घरची बेताची आर्थिक परिस्थिती, विभक्त कुटुंब किंवा एकल पालक अशा विविध अडचणींतून जाणाऱ्या मुलांचे मन अभ्यासात रमत नाही आणि अशीच मुले हळूहळू शैक्षणिक प्रवाहातून बाहेर पडतात. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सेवाध्यास फाउंडेशन, सांगली आणि विद्योदय मुक्तांगण, इचलकरंजी या दोन संस्थांनी ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांच्या सहकार्याने 'आनंदी शिक्षण' हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या यंदाच्या पहिल्या शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. २ व ३ ऑगस्ट रोजी महात्मा गांधी वाचनालय, वखार भाग, सांगली येथे करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन वुमन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा व ज्येष्ठ समाजसेविका डॉ. लताताई देशपांडे आणि सामाजिक संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सांगलीतील प्रसिद्ध वकील व कर सल्लागार श्री. किशोर लुल्ला यांच्या हस्ते झाले. शिबिराची सांगता सहकारमहर्षी कै. अण्णासाहेब कराळे यांचे सुपुत्र श्री. प्रकाश कराळे यांच्या उपस्थितीत झाली.
ज्ञानप्रबोधिनीच्या कार्याचा सांगलीत प्रसार करणारे अॅड. शैलेंद्र केळकर, तसेच ज्ञानप्रबोधिनीचे श्री. सुरज रसाळ व श्री. जयंत पाठक,श्री सचिन खारवे, यांनी तासगाव, इचलकरंजी व सांगली येथील 'आनंदी शिक्षण' उपक्रमातील सर्व शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवर व ज्ञानप्रबोधिनीच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सेवाध्यास फाउंडेशन मोठी झेप घेईल आणि 'आनंदी शिक्षण'सारखे उपक्रम अधिकाधिक शाळांपर्यंत पोहोचवेल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष श्री. अमेय फाळके आणि सेवाध्यासच्या टीमने व्यक्त केला. उपक्रम सुरू असलेल्या शाळांचे मुख्याध्यापकही या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. योगेश झांबरे यांनी केले, तर संस्थेचा परिचय श्री. विजय निकम यांनी करून दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय लड्डा, गोमटेश किल्लेदार, संदीप जाधव, कुणाल शिवलकर, विनायक बुटाले, गजानन सावंत, दिपाली बुटाले, विदुला दिवेकर, प्राजक्ता गाडगीळ, आरती गुर्जर व श्री. सुशांत निकम यांचे सहकार्य लाभले.
प्रशिक्षणासाठी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल महात्मा गांधी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ.अशोक मेहता, उपाध्यक्षा डॉ. लताताई देशपांडे तसेच श्री. दिगंबर सूर्यवंशी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सेवाध्यास चमूतर्फे मनःपूर्वक आभार.🙏