विज्ञान आश्रम भेट
August 16, 2025
आपण सेवाध्यासचे काम करत असताना इतर संस्था कशा काम करतात, त्यांच्याकडून आपल्याला काय शिकायला मिळेल व तसेच त्यांच्या सहकार्यातून काही योजना राबवता येतील का.. याचा अभ्यास करत राहणे, हे पण महत्वाचे आहे.
हाच धागा पकडून सेवाध्यास तर्फे विजय निकम, योगेश झांबरे, विक्रम वाटवे व महेंद्र जोशी यांनी पुण्याजवळील पाबळ स्थित *विज्ञान आश्रम* या संस्थेला २ ऑगस्ट २०२५ रोजी भेट दिली.
या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट जे कोणी येथे शिक्षण घेतात त्यांना विविध व्यावसायिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे व आपापल्या गावी तो उद्योग सुरू करून आपला चरितार्थ चालविण्यास सक्षम करणे हेच आहे.
ही संस्था नुसतेच व्यावसायिक शिक्षण देऊन थांबत नाहीतर त्यांना व्यवसाय सुरू करण्यास सर्वतोपरी मदत करते. यात वित्तीय संस्थांशी संपर्क, व्यवसाय करण्यास लागणारे परवाने मिळवून देणे, इत्यादी मदत करते. या शिक्षणासाठी एकदम वाजवी शुल्क आकारण्यात येते. त्यात निवास व भोजन व्यवस्था करण्यात येते. इथे शिकण्यासाठी कोणत्याही पदवीची अट नाही. आठवी पास एवढीच आवश्यकता आहे.
बऱ्याच वेळेस आर्थिक परिस्थितीमुळे व कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळेच काहींना पदवी शिक्षण घेणे कठीण जाते. अशा परिस्थितीत या संस्थेतील शिक्षणाने त्यांना निश्चितच स्वतः च्या पायावर उभे रहाण्यास मदत होईल व कुटुंबास आर्थिक हातभार पण लागेल.
आपण सेवाध्यास मार्फत ज्ञान प्रबोधिनी पुणे या संस्थेच्या सहकार्यातून आनंदी शिक्षण या उपक्रमातील काही भाग सांगली भागात राबवत आहोतच जेणेकरून गरीब व होतकरू मुले जी अभ्यासात मागे पडली आहेत ती शालेय शिक्षण मध्येच सोडून न देता पूर्ण करतील. तसेच विज्ञान आश्रम,पाबळ यांच्या सहकार्यातून सांगली भागातील गरजू विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देता येईल का याचा विचार भविष्यात सेवाध्यास निश्चितच करेल.