मराठी शाळांना बळ देणारा सेवाध्यासचा प्रयत्न
May 05, 2026
गरजू विद्यार्थी परस्थिती अभावी शैक्षणिक प्रवाहातून बाहेर पडू नयेत तसेच बऱ्याच छोट्या शाळा पट संखे अभावी कमी होत चालल्या आहेत त्या मुळे परिस्थिती नसलेले विद्यार्थी शिकण्याच्या वयात काय मिळेल ते काम करायला तयार होत आहेत,वाईट मार्गाला लागण्याचे धोके खूप आहेत हे ओळखून अशा शाळांना भेटी देणे तेथील अडचणी जाणून घेणे आणि पट संख्या टिकावी ,जास्तीत जास्त विद्यार्थी शाळेत कसे येतील या साठी
सेवाध्यास फाउंडेशन ची टीम तत्परतेने काम करत आहे ,याच विचारातून आज नरसोबावाडी मंदिराच्या मुख्य कमानीला लागून असलेल्या दत्त प्राथमिक विद्या मंदिर या शाळेला सेवाध्यास फाउंडेशन कडून भेट दिली .खूप छान वाटलं. विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले ,घरची परिस्थीती नसतानाही शिक्षण घेण्याची धडपड पहायला मिळाली , येथील शिक्षक सुद्धा खूप उत्साही वाटले , विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांचेही खूप छान प्रयत्न सुरू आहेत, आपल्याकडून फुल ना फुलाची पाकळी मदत मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे मग ती ज्ञानरूपी असेल किंवा वस्तुरूपी असेल .
सेवाध्यास ज्ञानप्रबोधिनी च्या मदतीने मराठी शाळांमध्ये राबवत असलेला आनंदी शिक्षण हा उपक्रम त्यांच्या शाळेत राबविला जावा अशी इच्छा येथील शिक्षकांनी व्यक्त केली आणि त्या संदर्भात सकारात्मक चर्चाही झाली.
निश्चितच या शाळेमध्ये ज्ञान प्रबोधिनीचा प्रकल्प राबविण्या बाबत आणि गरजू विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शैक्षणिक वस्तू देण्याबाबत सेवाध्यास निश्चितच प्रयत्नशील राहील.
इथेही बरेच विद्यार्थी असे होते की ज्यांना आई-वडील नाहीत.
धडपडणारे शिक्षक आणि या निरागस विद्यार्थ्यांच्या पाठीशी सेवाध्यास निश्चितच राहील असे आश्वासन आम्ही दिले आहे.
मुख्याध्यापिका सौ कुंभार मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक
सेवाध्यास संस्थेचे सदस्य आलास चे कोळी सर ,अमोल कोळी यांचेही मनःपूर्वक आभार.