घरोघरी तिरंगा या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये ध्वजारोहण
August 13, 2025
घरोघरी तिरंगा या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेमध्ये सलग तीन दिवस १३ ,१४,१५ ऑगस्ट या तारखाना ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला जात आहे , याच उपक्रमाअंतर्गत सर्वोदय शिक्षण मंडळ संचलित गुरुवर्य वा.के.सावईकर प्राथमिक शाळा सांगली, या शाळेत आज दिनांक १३/८/२०२५ रोजी ध्वजारोहणाचा मान आपल्या सेवाध्यास फाउंडेशन ला मिळाला ,आपण सर्वांनी मिळून जो सेवेचा ध्यास घेतला आहे त्या सेवेच्या ध्यासाची ही पोच पावतीच म्हणावी लागेल. मुख्याध्यापक श्री.अरविंद गावडे सर यांनी सुद्धा आपल्या संस्थेवर विश्वास आणि प्रेम दाखवलं आणि आपल्याला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक धन्यवाद ,प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या सर्व शिक्षकांनी अतिशय कमी वेळेत या सगळ्या कार्यक्रमाचे नियोजन खूप छान पद्धतीने केले होते.
आपल्या सेवाध्यास फाउंडेशन चे सर्व सदस्य ,देणगीदार या सर्वांच्या सहकार्यातून सेवाध्यास चे कार्य दिवसेंदिवस असेच वाढत राहुदे हीच या तिरंग्याच्या चरणी प्रार्थना.
जय हिंद
आपल्या सेवाध्यास फाउंडेशन चे सर्व सदस्य ,देणगीदार या सर्वांच्या सहकार्यातून सेवाध्यास चे कार्य दिवसेंदिवस असेच वाढत राहुदे हीच या तिरंग्याच्या चरणी प्रार्थना.
जय हिंद



