आनंदी शिक्षण २०२६–२७ पूर्वतयारी कार्यशाळा
July 07, 2026
आनंदी शिक्षण २०२६ - २७ प्रकल्प पूर्वतयारी कार्यशाळा शनिवार दिनांक ४.७.२०२६ रोजी संपन्न झाली.
कार्यशाळेची सुरवात सूरज रसाळ सरांनी एक प्रश्नावली देऊन केली. यामध्ये काही इंटरेस्टिंग असे प्रश्न होते ज्याचा भर सगळे फॅसिलिटेटर शिक्षण या प्रक्रियेकडे कसे बघतात यावर होता.
त्यानंतर दोघांनी खेळायचा असा एक कार्ड गेम होता, त्यामध्ये एकाग्रता आणि सूक्ष्म निरीक्षण यावर भर होता.
4C (Critical thinking, Creativity, Communication,Collaboration) ही संकल्पना आणि त्याचे शिक्षण प्रक्रियेतील महत्व सर्वांनी समजावून घेतले.
पुढचे सत्र बाल मानसशास्त्र यावर आधारीत होते. माँटेसरी, रूसो यांच्या काही संकल्पना समजावून घेऊन गटचर्चा झाली.
पुढील सत्र मुलांना द्यावयाच्या २१ इनपूटस बद्दल होते. त्यासाठी सत्रांची रचना कशी करता येईल यावर चर्चा झाली.
अशा पद्धतीने एक नवीन सुरवात करण्यास फॅसिलिटेटर सज्ज होऊन, येणाऱ्या आठवड्याच्या सत्राचे नियोजन मनात घेऊन त्यांनी सर्वांचा निरोप घेतला.
सर्व उपस्थित फॅसिलिटेटर / विद्यार्थी मित्र आणि सूरज रसाळ सर तुमचे सेवाध्यास परिवारा तर्फे मनःपूर्वक आभार.
आम्हाला हॉल उपलब्ध करून दिल्या बद्दल आर. बी.पाटील सर यांचेही विशेष आभार.