आनंदी शिक्षण उपक्रम सेवाध्यास फाउंडेशन
May 04, 2026
अभ्यासात मागे पडणाऱ्या ,शाळेची गोडी कमी असणाऱ्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी गेले वर्ष भर (शैक्षणिक सत्र २०२५ ते २०२६ )आनंदी शिक्षण हा उपक्रम सेवाध्यास फाउंडेशन,सांगली आणि ज्ञानप्रबोधिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज महापालिका शाळा नंबर ६ आणि सावईकर शाळा वडर कॉलनी सांगली या ठिकाणी आपण राबवला होता ,मुलांना हे आनंदी शिक्षण या उपक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी दोन महिला दर महा मानधन तत्वावर निवडल्या होत्या.
त्या पैकी मिरज महापालिका शाळा ६ येथे आपण या उपक्रमाची सांगता केली शिक्षकांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला हा उपक्रम राबवण्यासाठी परवानगी दिली त्यामुळे त्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. मुलांना खाऊ वाटप केले,काही पालकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ,या उपक्रमा मुळे मुलांमध्ये होणारा बदल हा निश्चितच सकारात्मक असल्याचे जाणवले ,त्यामुळे दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी हा प्रकल्प चालू वर्षात सुद्धा राबवण्याची विनंती सेवाध्यास ला केली आहे.
काही कारणास्तव सावईकर शाळा वडर कॉलनी सांगली येथे या उपक्रमाची सांगता करता आली नाही परंतु या पोस्ट च्या माध्यमातून सावईकर शाळा वडर कॉलनी ,सांगली या शाळेचे मुख्याध्यापक श्री अरविंद गावडे सर आणि त्यांचे सहकारी यांचेही आम्ही आभार मानतो कारण त्यांनी सुद्धा आमचा हा प्रकल्प त्यांच्या शाळेत राबवण्यासाठी मोलाची साथ दिली .
त्याच बरोबर महिला प्रशिक्षक गौरी ताई,आरती ताई ,
ज्ञानप्रबोधिनीचे,सूरज रसाळ सर आणि सर्व सहकारी यांचे मनःपूर्वक आभार.
दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांच्या विनंतीनुसार येत्या शैक्षणिक वर्षात सुद्धा हा प्रकल्प आम्ही राबवणार आहोत त्याच बरोबर आणखी दोन नवीन शाळा या प्रकल्पासाठी निवडायचा आमचा मानस आहे.
तुमच्या सर्वांची , देणगीदारांची साथ अशीच लाभली तर निश्चितच याचा विस्तार करता येईल.
धन्यवाद
सेवाध्यास परिवार ,सांगली